Desh

पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने सुरू होणार तसंच मोबाईल रिचार्ज करता येणार – केंद्रीय गृहमंत्रालय

By PCB Author

April 24, 2020

नवी दिल्ली, दि.२४(पीसीबी) – आता पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने सुरू होणार तसंच मोबाईल रिचार्ज करता येणार आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

अत्यावश्यक सेवा वगळता केंद्र सरकारने इतर नागरिकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे. केंद्र सरकारने आता यामध्ये आणखी थोडी सूट दिली आहे. पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने आता सुरू ठेवता येणार आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवससुरू असल्याने आणि गरमी वाढू लागल्याने पंख्यांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सूट देण्यात आली आहे.

दरम्यान लॉकडाऊन कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून पुस्तकांची दुकाने देखील सुरू राहणार आहेत. तसंच मोबाइल प्रीपेड रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.