पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक?; पाकिस्तानने दहशतवादी अड्ड्यांना हलवले  

0
772

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – उरी हल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. आता पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतावाद्याविरोधात भारत कडक कारवाई करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा   सर्जिकल स्ट्राईक होण्याची  धास्ती घेतली आहे.

पाकिस्तानने  सीमेलगतच्या  दहशतवादी अड्ड्यांना  लष्कर कँपजवळ हलवण्यास सुरूवात केल्याची माहिती मिळत आहे. सीमारेषेच्या दोन्ही बाजूला सध्या तणावाचे वातावरण आहे. पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे.  त्यानंतर  लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

भारतही कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या  दहशतवादी  अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवले आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर भारत  कारवाई करणार नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे.