Desh

पुलवामा हल्ल्यानंतर देशभक्तीचे वारे, त्याचे मतात रूपांतर करा; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

By PCB Author

February 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या  दहशतवादी हल्ल्यात ४८ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशात सध्या ‘देशभक्तीचे वारे वाहू लागले आहे.  सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र येत आहेत.  याचे रुपांतर मतांमध्ये करावे लागेल, असे  वादग्रस्त विधान भाजप नेते आणि गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी केले आहे.

भाजपच्या कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये पंड्या बोलत होते. ते म्हणाले की,  पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर  देशभक्ती दाखवण्यासाठी सर्व मतभेद दूर करुन देशातील सर्व लोक एकत्र आले आहेत. रॅली आणि आंदोलने करून या लोकांनी देशासाठी असलेले आपलेले प्रेम व्यक्त केले आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे, असे पंड्या म्हणाला.

दरम्यान, पंड्या यांनी  कार्यकर्त्यांना बोलताना  विचार करुन बोलण्याचा सल्ला दिला. तसेच तुमच्या कोणत्याही वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी,  असेही  त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.