Maharashtra

पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना शिक्षा काय द्यायची, हे जवान ठरवतील – पंतप्रधान मोदी

By PCB Author

February 16, 2019

यवतमाळ, दि. १६ (पीसीबी) – पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना शिक्षा कधी, कशी, केव्हा, कोण आणि कोणत्या प्रकारे दिली जाईल, हे आमचे जवान ठरवतील,  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  म्हटले आहे. लोकांनी धैर्य तसेच आपल्या जवानांवर विश्वास ठेवावा,  असे आवाहन त्यांनी  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बोलताना  आज (शनिवार) केले.  

पुलवामा येथील घटनेवर तुमचा आक्रोश समजू शकतो. महाराष्ट्राच्या दोन जवानांनी देशसेवा बजवाताना आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबाचे दुख: मी समजू शकतो. आपल्या सर्वांच्या भावना त्यांच्यासोबत आहेत. या शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे मोदी यावेळी म्हणाले.

आमचा सैनिकांवर गर्व आणि विश्वास आहे. सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. असे  त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.  एक असा देश जो फाळणीनंतर जन्माला आला, जिथे दहशतवादाला आश्रय दिला जातो. आज दिवाळखोर होण्याचा मार्गावर आहे तो दहशतवादाचा दुसरा मार्ग झाला आहे अशी टीका मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता केली. आज आपण स्वप्न  बघतो, विकास करत आहोत यामागे अनेकांचे बलिदान आहे,  असे मोदी म्हणाले.