पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार मुदस्सर खान याला कंठस्नान

0
615

काश्मिर, दि. १२ (पीसीबी) – पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भयाड हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सर अहमद खान याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ही कारवाई सोमवार (दि.११) दक्षिण काश्मिरातील त्राल येथे करण्यात आली.  

मुदस्सर जैश ए महम्मदचा दहशतवादी होता. त्याच्याबरोबर असलेला दुसरा अतिरेकीही ठार झाला असून तो पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.

त्राल भागात अतिरेकी लपल्याची खबर आल्यावरून कारवाई सुरू होती. त्यावेळी रविवारी सायंकाळी मुदस्सर अहमद खान आणि त्याच्या बरोबर असलेल्या अतिरेक्याने जवानांवर गोळीबार सुरू केला होता. त्यानंतर सुरू झालेली चकमक सोमवारपर्यंत चालू होती. यात या दोन्ही अतिरेक्यांना टिपून काढण्यात सुरक्षा दलांना यश आले. सीआरपीएफचे जम्मू आणि काश्मीरमधील महानिरीक्षक जुल्फिकार हसन यांनी मात्र हा पुलवामा हल्ल्याचा सूम्ड नाही, असे स्पष्ट केले. आम्ही शांततेला प्राधान्य देतो आणि देशाविरोधात कुणीही हाती शस्त्र घेऊ नये, असे मानतो, असे ते म्हणाले. मुदस्सर जिथे दडून बसला होता त्या जागी काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. ते पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आले आहेत.