Chinchwad

पुरूषांइतकीच स्त्रीही खंबीर, मोठी संकटे सहज परतवते– अश्विनी जगताप

By PCB Author

November 20, 2018

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पुरूष सशक्त असले, तरी कोमल आणि हळव्या स्वभावाची स्त्री परिस्थितीनुसार खंबीर होऊन मोठी संकटे सहज परतवू शकते, असे प्रतिपादन प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अश्विनी जगताप यांनी केले.

प्रतिभा महिला प्रतिष्ठान व रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळेगुरव येथे आयोजित आदर्श माता पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, माधवी राजापुरे, नगरसेवक हर्षल ढोरे, माजी नगरसेवक शंकर जगताप आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविना आंगोळकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. दिलीप कांबळे यांनी आभार मानले.