Maharashtra

पुरग्रस्तांना तुम्ही येथे मदत करू शकता

By PCB Author

August 10, 2019

पुणे, दि. 10 (पीसीबी) – तुम्हाला पुरग्रस्तांना मदत करायची आहे. मात्र, ती कोठे करावी हे माहिती नसेल तर पुण्याच्या विभागीय कार्यालयात विशेष मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. किंवा मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फतही मदत करता येऊ शकते.

पुण्याच्या विभागीय कार्यालयातील मदत केंद्रात ‘रेडी टू इट’ अन्न पदार्थ तसेच नवे कपडे, चादरी, ब्लॅकेट इत्यादी साहित्य तुम्ही दान करू शकता.

तर दानशुर व्यक्ती ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ बँक खात्यातही पैशाच्या स्वरूपात मदत करू शकता. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी बँक खाते क्रमांक – 10972433751 आणि IFSC NO. SBIN0000300 बँच कोड – 003000

अधिक माहितीसाठी, भारत वाघमारे 9850791111 किंवा सुरेखा माने 7775905315 यांना संपर्क करू शकता.