पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची मागणी  

0
669

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे ऑगस्ट महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात यावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर, सांगली,  कराड व कोयना धरणक्षेत्रामध्ये  मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूर शहर व आजूबाजूची गावे, सांगली, वाळवा,शिराळा व पलूस या तालुक्यामध्ये तसेच इचलकरंजी शहराच्या काही भागामध्ये पंचगंगा नदीच्या  महापुराचे पाणी नागरीवस्तीत घुसल्यामुळे हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत.

महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चे ३६ नगरसेवक असून  २  स्वीकृत  सदस्य  असे एकुण ३८  नगरसेवक  आहेत.  या नगरसेवकांचे  ऑगस्ट  महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.