Maharashtra

पुरग्रस्तांचा मदतनिधी बँकेत जमा करण्यास काँग्रेसचा विरोध

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारा १५४ कोटी रुपयांचा मदत निधी बँकांच्या खात्यात जमा होणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने  विरोध  करून पीडितांना बँकेच्या चकरा मारायला लावणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘आपत्तीत आजवर शासकीय मदत ही रोख दिली गेली. पण आता शासनाने मदत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांचे संसार उद्धवस्त झाले असताना बँकेच्या वाऱ्या करायला लावणे योग्य नाही. शनिवार, रविवारी बँका बंद असतात.  तसेच बँक व्यवस्थापन लोकांपर्यंत पोहचवा अशी विनंतीही सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून ५० लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसेच बारामतीकरांनीही अवघ्या काही मिनिटांमध्ये मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे.