पुरंदरमध्ये आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृध्दाने केला बलात्कार

0
876

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे एका ८ वर्षांच्या चिमुरडीवर नराधम वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि.९ सप्टेंबर) घडली होती.

शंकर मारुती बडदे (वय ६१ वर्षे रा. कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे) असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी बडदे याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ८ वर्षीय चिमुरडी (९ सप्टेंबर) रोजी आपल्या मैत्रिणींबरोबर घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपीने या बालिकेला आपल्या घरात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आजीने चौकशी केली असता हा घडलेला प्रकार पीडित मुलीने आजीला सांगितला. यानंतर मुलीच्या आजीने सासवड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी त्यानुसार आरोपी शंकर बडदे विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.