पुन्हा १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी देऊ नका – अरविंद केजरीवाल

0
461

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधान केले होते.  आता २०१९ मधील निवडणुकीत जनतेने ही चूक करून नये, यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी देण्यात यावी, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  म्हटले आहे.

दिल्लीत विरोधी पक्षांची सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना केजरीवाल यांनी   भाजप आणि मोदींवर निशाणा साधला. गेल्यावेळी तुम्ही १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. यंदा या चुकीची पुनरावृत्ती करु नका. यावेळी एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्या. पंतप्रधानपद अत्यंत महत्त्वाचे पद आहे. १२ वी पास व्यक्तीला हस्ताक्षर कुठे करायचे, हेच कळत नाही, असे ते म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, १४ एप्रिल २०११ रोजी जंतर मंतरवरील ऐतिहासिक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर देशातील जनतेने तत्कालीन यूपीए सरकारला सत्तेतून घालवले होते. त्याच पद्धदतीने आता या सभेनंतर जनता मोदी सरकारला उखडून टाकेल, असे केजरीवाल म्हणाले.