पुन्हा मराठीच राजकारण का झालं सुरु? मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना दोन वेगवेगळे माफीनामा; पण का?

0
231

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र आणि राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’. कलर्स वाल्यांना पण माहिती आहे खरं सरकार कुठे आहे,’ असं ट्विट अमेय खोपकरांनी केलं आहे. ‘बिग बॉस १४’चा स्पर्धक व गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले आणि त्यानंतर वाद सुरू झाला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर अन्य पक्षाच्या नेत्यांनी जान कुमार सानू आणि कलर्स वाहिनीला इशारा दिला. वाढता विरोध पाहता कलर्स वाहिनीकडून एक माफीनामा सादर करण्यात आला. मात्र इंग्रजी-मराठी भाषेतील पत्रावरून आता मनसेनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

आता पुन्हा एकदा मराठीचं राजकारण रंगलं आहेकारण, कलर्स मराठीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इंग्रजीत आणि राज ठाकरेंना मराठीत माफिनाम्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. ‘शुद्ध मराठीतील माफीनामा…बाकीच्यांसारखे इंग्रजी लेटर घेऊन शांत बसले नाहीत! महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला गेलाच पाहिजे.’ अशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी फेसबुकवर माफिनामा पोस्ट करत लिहिलं,