Pune

पुना हॉस्पिटलमधील विश्रांती कक्षात डेंटिस्टची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

October 08, 2018

पुणे, दि. ८ (पीसीबी) – पुना हॉस्पिटलमधील विश्रांती कक्षात एका डेंटिस्टने नैराश्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली.

शशिकांत बंब (वय ६३) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुना हॉस्पिटलमध्ये शशिकांत बंब हे डेंटिस्ट होते. ते आज सकाळी विश्रांती कक्षात आराम करण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही वेळाने दुसरे डॉक्टर विश्रांती कक्षात गेल्यानंतर शशिकांत बंब यांनी गळफास घेतल्याचे दिसले. बंब यांच्याजवळ सुसाइड नोट सापडली असून माझ्या मृत्यूस कोणाला कारणीभूत धरू नये. नैराश्यामुळे हे पाऊल उचल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे.