Banner News

पुनःश्च हरिओम, आगामी काळात आरोग्याला, शिक्षणाला प्राधान्य देणार – उध्दव ठाकरे

By PCB Author

May 31, 2020

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – पुनःश्च हरी ओम म्हणजे पुन्हा एकदा लढाईला सुरवात करायची आहे. येत्या काळात आरोग्याला, शिक्षणाला प्राधान्य द्यायचे, असे मी ठरवलेले आहे. राज्यभर त्यासाठी सुविधा निर्माण करणार आहोत. आता खबरदारी व जबाबदारी एकत्र करण्याची वेळ आली आहे. ही वाट निसरडी आहे पण ऐकमेकांचे हात धरून वाटचाल करू या. लॅकडाऊन हा शब्द केराच्या टोपलीत फेकून देऊ, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.

३१  ला संपत असलेला लॅकडाऊ आणि सुरू होणाऱ्या पाचव्या लॅकडाऊनबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी फेसबूक लाईव्ह संवाद साधला. कोरोनाच्या संकटकाळात सरकारने दोन महिन्यांत काय काय काम केले आणि पुढे काय करणार याचा लेखाजोखा त्यांनी सादर केला. पाऊन तासाच्या भाषणात त्यांनी भाजपालाही चिमटे काढले. आपले राज्या कुठेही कमी पडलेले नाही, पडणार नाही हे आकडेवारी देत स्पष्ठ करताना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान आपलेच काही मित्र करत असल्याची टीका त्यांनी देवेंद्र फऱडणवीस यांचे नाव न घेता केली. – ठाकरे म्हणाले, लॅकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या टोपलीत फेकायचा आहे. चक्रीवादळाची शक्यता, पश्चिम किनारपट्टीच्या लोकांनी सज्ज रहा, मस्छिमारांनो सावध रहा. वादळ दिशा बदलेले अशी आशा आहे, मात्र सावध रहा. यंदाचा पाऊस हा चांगला राहणार आहे. कोरोना सोबत जगायला शिका हे आपण ऐकतो, तोंडावर मास्क जरुरीचे आहे. काही देशांनी लॅकडाऊन केलाच नाही, एका देशाने शाळा सुरू केल्या आणि पुन्हा बंद केल्या. आपण उघडझाप करायची नाही, जी सुरू करू ती पुन्हा बंद करायची नाही. पुढचे काही दिवस नियम काटेकोरपणे पाळा, आवश्यक नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका ,अंतर ठेऊन फिरायचे आहे, गर्दी करायची नाही. लक्षणे आढळली सर्दी, खोकला ,ताप, नाकाचा वास जाणे, तोंडाची चव जाणे असे दिसले तर त्वरीत रुग्णालयात संपर्क करा. सद्या आपण सर्वोच्च बिंदूच्या जवळ जातो आहोत कींवा टीपेला पोहचतो आहे. काही काळ संख्या वरखाली होईल, पण या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे, असेही ठाकरे यांनी आवर्जुन सांगितले. महाराष्ट्रापासून इतरांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा पध्दतीने काम करून दाखवायचे आहे, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे असे – – ५ तारखेपासून शहरातील रस्त्याच्या दुतर्फाची दुकाने सम- विषम तारखांना उघडतील – ८ पासून कार्यालये सुरू करत आहोत. कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्के पासून सुरू करू – महाराष्ट्रात ६५ हजार केसेसे, पहिला रुग्ण बरा होऊन गेला. आजवर २८ हजारावर रुग्ण घरी गेले. – ३४ हजार सकारात्मक, त्यात २४ हजार क्वारंटाईन आहेत.त्यात मध्यम, तीव्र असे ९५०० आहेत. – अतिगंभीर २०० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. त्यातूनही काही रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत – पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्याची परवानगी देणार, मात्र मुलांची काळजी घेतली पाहिजे – सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाऊ शकता, पहाटे ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वेळ राहील – कोरोनाची टेस्ट फक्त २ ठिकाणी आहे, कस्तुरबा आणि एनआयव्ही आता ७७ चाचणी केंद आहेत ती १०० वर जातील. येत्या पावसाळ्यात टेस्टची संख्या आणखी वाढविण्याची गरज आहे. केंद्राशी बोलतो आहोत. सर्वसामान्यांच्या आवाक्यात त्याची किंमत आणतो आहोत. तुमच्या घराजवळ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. – रुग्णाला बेडच उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. आता राज्यात फक्त ३ इन्फेक्शन ची हॅस्पीटल आता २५७५ – बेड अडिच लाखाच्या वर झाले आहेत. २५ हजार बेड ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. – आयसीयू बेड फक्त २५० पर्यंत होते, ते २५०० वर गेलेत. – जिथे जिथे फिल्ड हॅस्पिटलची सोय तिथे करतोय, इतर राज्यात किती ते आपण पाहतो – मृत्यूदर हा शून्यावर आणायचा आहे. – इतर राज्यातील मजूर, १६ लाख मजुरांना ८०० ट्रेन मधून त्यांच्या गावाला जाऊ दिले – ४२,५०० बसेसमधून ५.२५ लाख मजुरांना त्यांच्या सिमेपर्यंत सोडले – शिवभोजनथाळी योजनेतून ३२ लाख ७७ हजार लोकांना भोजन दिले. – मुख्यमंत्री सहायता निधीत १११ कोटी कोव्हीडसाठी खर्च केले – उद्योगधंदे सुरू झालेत, ७.५ लाख मजूर कामावर आलेत. – विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गूण देणार – शाळा कशा सुरू करायच्या त्या पेक्षा शिक्षण कसे देणार हा प्रश्न आहे, ऑन लाईन शिक्षण देऊ शकतो तिथे सुरू करू. काही दिवसांत ठोस निर्णय घेऊ. शिक्षण सुरू करूच