Maharashtra

पुतळा उभारण्याला माझा विरोध आहे, पण… – प्रकाश आंबेडकर

By PCB Author

September 19, 2020

मुंबई,दि.१९(पीसीबी) – मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे पण पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. करोनातून लोकांना वाचवणं ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी करोनासाठी खर्च करावा,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान “तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा आंतरराष्ट्रीय केंद्रासाठी दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पत्राचं अध्ययन मुख्यमंत्र्यांनी करावं,” असंही त्यांनी नमूद केलं.