पुण्यामध्ये आणखी २ पोलिस आधिकाऱ्यांना ‘कोरोना’ ची लागण

0
240

>> सहकाऱ्यांना केले क्वारंटाईन

पुणे, दि. ०४ (पीसीबी) – पुणे शहर पोलिस दलातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्यवर्ती पोलिस ठाण्यातील हे दोन्ही अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करुन त्यांची तपासणी केली जाणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पुणे शहर पोलिस दलात एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली होती, सुदैवाने त्या पोलिस ठाण्यात असलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले. या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना थंडी, ताप, खोकला येत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही अधिकारी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यांच्या संपर्कात आलेल्यांची सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत शहर पोलिस दलात २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे व त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.