पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई

0
626

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पुण्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड मध्येही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

दरम्यान, गेल्या दोन दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या ८ प्रभागातील पथकांकडून ही कारवाई शहरभर सुरु आहे. थुंकणाऱ्यांसोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे -१५० रुपये दंड, रस्त्यावर अस्वच्छता पसरवणे -१८० रुपये दंड,  उघड्यावर लघुशंका करणे – २०० रुपये दंड, उघड्यावर शौच करणे – ५०० रुपये दंड आकारला जात आहे. तर दंड न भरल्यास पोलिसांत तक्रार दिली  जाणार आहे.