पुण्याने नरहर गणपत पवारांना काय दिले? शरद पवारांची खंत

0
888

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पुणे शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पवार बोलत होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, माणदेशाने महाराष्ट्राला ग.दि. माडगूळकरांचे साहित्यिक दिले. मात्र माफ करा पुण्याने त्यांचा सन्मान केला नाही. म्हणून मी बारामतीला ग. दी माडगूळकर या नावाने मोठे सभागृह बांधले.