पुण्यात स्मृती इराणी विरोधात फौजदारी खटला दाखल

0
594

पुणे, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अ‍ॅड़. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा खटला दाखल केला. प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात आज (मंगळवार) हा खटला दाखल करण्यात आला. लवकरच यावर न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे़.