Pune

पुण्यात विसर्जन मिरवणूकीवर दगडफेक; काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवेसह १३ कार्यकर्त्यांना अटक

By PCB Author

September 24, 2018

पुणे, दि. २४ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणूकीवर दगड, चप्पल आणि बुट फेकून डिजे आणि ट्रॅक्टर चालकाला मारहाण केल्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठेतील राजीव गांधी पतसंस्थेसमोर घडली.

याप्रकरणी युवराज सुलतान अडसुळ (वय २७, भवानी पेठ, राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार नगरसेवक  अविनाश बागवेसह त्यांचा पीए अरुण गायकवाड आणि अण्य १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भवानी पेठेतील राजीव गांधी पतसंस्थेसमोरुन कासेवाडी येथील अशोक तरुण मंडळाची मिरवणुक विजर्सनासाठी चालली होती. यावेळी अविनाश बाहवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ट्रॅकटर चालक आणि डीजेला मारहाण करुन साऊंड सिस्टीमची तोडफोड केली. तसेच मिरवणुकीवर बुट, चप्पल आणि दगड फेक केली. खडक पोलिसांनी अविनाश बागवेसह त्यांचा पीए अरुण गायकवाड आणि अण्य १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  खडक पोलिस अधिक तपास करत आहेत.