पुण्यात विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचा मूक महामोर्चा

0
460

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण कायम ठेवावे. तसेच गोरक्षा, लव जिहाद, मुस्लिम व्यक्तींची समूहाकडून होणाऱ्या हत्या रोखाव्यात, यासह विविध मागण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज (रविवार) मुस्लिम मूक महामोर्चा काढण्यात आला. गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत काढण्यात आलेल्या या  मोर्चात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुण्यातील गोळीबार मैदानावरून निघालेला मूकमोर्चा सेव्हन लव्ह चौकापासून रामोशी गेट, केईएम हॉस्पिटल, नरपतगिरी चौक, जिल्हा परिषदेची जुनी इमारत तेथून पुढे विधानभवनासमोर या मोर्चाची सांगता करण्यात आली.

धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, यासह विविध मागण्याचे फलक घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या मागण्यांची  केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेऊन  उपाय योजना कराव्यात, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली.