पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक

0
1082

पुणे, दि. १३ (पीसीबी) चित्रकलेची वही अपुर्ण असल्याच्या कारणावरून सहावीच्या विद्यार्थ्याला  बेदम मारहाण  करणाऱ्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल  ( एसएसपीएमएस) या शाळेतील शिक्षकाला  आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे.

संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्न पाटील या विद्यार्थ्याला  केलेल्या  मारहाणीत त्याच्या शरीराचा उजवा भाग लुळा पडला आहे, तसेच चेहरा वाकडा झाला. तसेच त्याला नीट बोलताही  येत नाही. या प्रकरणी प्रसन्नच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांना संदीप गाडेला  अटक केली आहे.

शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्यांना दोन चित्रे काढून आणण्यास सांगितली होती. मात्र प्रसन्न पाटीलने चित्रे काढली नव्हती. त्यामुळे चिडलेल्या संदीप गाडे या शिक्षकाने प्रसन्नला बेंचवर हात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर प्रसन्नला चेहऱ्यावर आणि पोटात मारहाण केली होती. मारहाणीमुळे प्रसन्नला गंभीर इजा झाली. प्रसन्नवर बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी दिले आहे.