पुण्यात मैत्रीणीसोबत बोलत बसलेल्या तरूणावर अॅसिड हल्ला; हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून घेतली

0
317

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी (दि. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर ॲसिड हल्ला झाला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करीत आहे. रोहीत थोरात असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला आहे.