पुण्यात बॅटरी चोरट्यांनी केला ट्रकचालकाचा खून

0
968

पुणे, दि. २२ (पीसीबी) – ट्रकचालकाच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकून बॅटरी चोरट्यांनी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) पहाटे अडीचच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर घडली.

दत्तात्रय गंगाधर भोईटे (वय ४०) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईटे हे बुधवारी रात्री ट्रक घेऊन सोलापूरकडे निघाले होते. मात्र   झोप आल्याने त्यांनी  मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ट्रक पार्क करून झोपी गेले. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांना काही चोर ट्रकची बॅटरी काढत असल्याचे  दिसले. त्यांनी चोरट्यांना विरोध केला, त्यात त्यांच्यात झटापट झाली. आणि चोरट्यांनी भोईटे यांच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकून त्यांचा खून केला. सकाळी अपघातात एका इसमाचा मृत्यू झाल्याचे हडपसर पोलीसांना काही नागरिकांनी कळवे. यावेळी तपासात भोईटे यांच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकून त्यांचा खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत बॅटरी चोरांची माहिती गोळा केली आणि आरोपी बॅटरी चोरांना काही तासातच अटक केली. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.