पुण्यात बंगल्याची उंची वाढवण्यासाठी चक्क लावले २५० जॅक

0
460

पुणे, दि. ११ (पीसीबी) – ‘पुणे तिथे काय उणे’ याची पुन्हा एकदा प्रचिती आली. पंक्चर झाल्यावर गाडीला ज्याप्रकारे जॅक लावून दुरूस्ती करणे हे खूप साहजिक आहे. मात्र पुण्यात दुरूस्तीसाठी जॅक लावून चक्क बंगलाच उचलण्यात आला. बंगल्याची उंची वाढवण्यासाठी हे जॅक लावण्यात आले आहेत. २००० स्केअर फुटांच्या बंगल्याला तब्ब्ल २५० जॅक लावून उचलण्यात आले.
पुण्यातील बी.टी. कवडे रस्ता येथील तारदत्त कॉलनीतील ‘भारद्वाज’ नावाचा बंगला आहे. घरासमोर वर्षानुवर्षे रस्त्याची दुरूस्ती होत राहिली, त्यामुळे रस्त्याची उंची वाढली. पण बंगल्याची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात घुसत होते. दरवर्षीच्या त्रासाला मालक वैतागले होते. त्यामुळे त्यांना बंगल्यीच उंची वाढवून रस्त्याच्या लेव्हलला आणायची होती. या समस्येपासून सुटकेसाठी ते पर्याय शोधत होते.
हाऊस लिफ्टिंग पद्धतीने बंगल्याची उंची वाढवण्याचा निर्णय ‘भारद्वाज’ बंगल्याच्या मालकांनी घेतला. त्यासाठई हरियाणाच्या एका ठेकेदाराला त्यांनी हे काम दिले. २००० स्क्वेअर फुटांच्या बंगल्याची चार फूट उंची वाढवण्यासाठी तब्बल २५० जॅक लावण्यात आले.