Pune

पुण्यात दहीहंडीचे फ्लेक्स लावण्याच्या वादातून तरूणाची हत्या

By PCB Author

September 01, 2018

पुणे, दि. १ (पीसीबी) – दहीहंडीचा बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी तलवारीने वार करून एका २४ वर्षीय दुकानदाराची हत्या केली आहे. हा प्रकार आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे घडला.

अक्षय अशोक घडसी (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील नॅशनल पार्क सोसायटीमध्ये अक्षय गडशी राहण्यास होता.तर त्याचे निलेश चौधरी आणि अन्य चार मित्राशी दहीहंडी चा फ्लेक्स कोणत्या चौकात आणि त्यावर कोणाचे फोटो असावे.यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.तो राग मनात धरून निलेश चौधरी आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या चार मित्रांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास माणिकबाग परिसरात अक्षयवर तलवारी ने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.

दरम्यान, अक्षय आणि पाचही आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा बॅनर लावण्यावरुन वाद झाला होता. अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. सिंहगड पोलिस तपास करत आहेत.