पुण्यात डीजेच्या नियमांचे उल्लंघन; २५ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल

0
325

पुणे, दि. २४ (पीसीबी) – उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही पुण्यात अनेक मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला तिलांजली देत विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा वापर केला. डीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.