पुण्यात टेकडीवरुन उडी मारुन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0
1284

पुणे, दि. १० (पीसीबी) –  इंजिनिअरिंगच्या एका विषयात नापास झाल्याने मित्र चिडवायचे म्हणून पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने टेकडीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

शुभम भोसले (वय २१, रा. धायरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. वडिलांसोबत तो ही सुरक्षारक्षकाचे काम करत होता. तो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या शिकत होता. यावर्षी तो एका विषयात नापास झाला होता. यावरून त्याचे मित्र त्याला चिडवत होते. याला वैतागूनच शुभम याने रायकर मळा परिसरातील टेकडीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत.