पुण्यात घरफोडी प्रकरणातील दोघा सराईतांना सव्वाबारा लाखांच्या ऐवजासह अटक

0
515

पुणे, दि. १८ (पीसीबी) – घरफोडी प्रकरणातील दोघा सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी सव्वाबारा लाखांच्‌या चोरीच्या ऐवजासह अटक केली आहे.   

गजराज मोतीलाल वर्मा (वय ३४, रा.कुपवाड, कवठेमहांकाळ) आणि गोरे उर्फ गणेश रती राणा (वय २९, रा. खडी मशीन चौक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई फरांदे आणि सोनुने यांना त्यांच्या खबऱ्याकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार गजराज आणि गणेश हे जेलमधून सुटले असून त्यांनी पुन्हा घरफोड्या केल्या असल्याची माहिती दिली. तेसेच दोघे आरोपी हे कात्रज चौकात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्यानुसार कात्रज चौकात जाऊन गजराज आणि गणेश या  दोघांचा शोध घेतला असता ते दोघे तिथेच घुटमळत असताना दिसले.  पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल २३ घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३८८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४३ हजारांची रोकड असा तब्बल १२ लाख ३४ हजार १६०  रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान, आरोपी गजराजवर घरफोडीचे २१ गुन्हे तर त्याचा साथीदार गणेशवर ११ गुन्हे दाखल आहेत.