Pune

पुण्यात कर्जाची परत फेड न केल्याने अल्पवयीन मुलीलाचे अपहरण करणाऱ्या तीघांना अटक

By PCB Author

July 12, 2018

येरवडा, दि. १२ (पीसीबी) – व्यवसायासाठी दोन लाख रुपये कर्ज घेतलेले परत केले नाही म्हणून कर्जदाराच्या अल्पवयीन पुतण्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज मंगळवार रात्री उशीरा येरवडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा मोठ्या शिताफीने छडा लावून अटक केली. विशाल दत्तात्रय ढोले (वय २५ रा.सणसवाडी शिक्रापूर) स्वप्नील शांताराम तांबे (वय २५ रा. गणेगाव वरुडे, शिरूर) सचिन बंडू थिटे (रा. सणसवाडी शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी विशाल ढोले यांचा भाऊ निखिल ढोले यांच्याकडून किसन जाधव यांनी दोन लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते .या कर्जाच्या रकमेसाठी ढोले यांनी जाधव यांच्याकडे तगादा लावला होता. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किसन यांचा सतरा वर्षांचा पुतण्या घराबाहेर फिरत असताना त्याला आरोपींनी बोलावून घेतले. एका चारचाकी गाडीत बसवत त्याला पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत पुतण्या घरी न आल्यामुळे जाधव यांनी याची माहिती येरवडा पोलिसांना दिली .येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सीडीआर व तपास पथकामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली. या तिघांनी सदरच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून टाटा गार्ड रूम येथे त्याला लपवून ठेवले असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जावून मुलाची सुटका केली. पोलिसांनी तिघाही आरोपींना अपहरणात वापरलेल्या चारचाकी झेन कार (एमएच ०२ पीए ९५१६) सह अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट ,पोलीस हवालदार हरिश्चंद्र मोरे, हनुमंत जाधव यांच्या पथकाने केली.