पुण्यातून सोमवार पासून रेल्वे सुरू

0
375

पुणे, दि.31 (पीसीबी) : रेल्वेच्या सोमवारपासून (ता. 1 जून) 200 गाड्या देशातील प्रमुख शहरांतून सुरू होणार आहेत. त्यातील पाच गाड्या पुण्यात येतील तर, पुण्यातून पाटणासाठी रोज गाडी सुटेल. या गाड्यांचे आता 120 दिवस अगोदर आरक्षण करता येणार आहे. त्याला आजपासून झाली.
एक जूनपासून सुरू होणाऱया रेल्वे गाड्यांत महाराष्ट्रातंर्गत प्रवासासाठी तिकिट देण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाराष्ट्रात रेल्वे प्रवास शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबई- पुणेही रेल्वे प्रवास कोणाला करता येणार नाही.

 मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बांद्रा टर्मिनसवरून त्यातील 14 गाड्या सुटणार आहेत. भुवनेश्वर, दरभंगा, वाराणसी, गदग, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, पाटलीपूत्र आदींचा त्यात समावेश आहे. या मार्गावरील 14 गाड्या मुंबईलाही परतणार आहेत. तसेच पुण्यातून पुणे- पाटना ही गाडी एक जूनपासून सुरू होणार आहे. तसेच मुंबई – भुवनेश्वर कोनार्क एक्स्प्रेस, निजामुद्दीन- गोवा, मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, मुंबई- गदग आदी गाड्या पुण्यातून पुढे जाणार आहेत. 
या गाड्यांचे आरक्षण या पूर्वी 30 दिवस अगोदर करता येत होते. आता ही सुविधा 120 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाड्यांत फक्त पाकिटबंद वस्तू, खाण्यासाठी तयार असलेले भोजन, पाण्याच्या सीलबंद बॉटल्स, चहा, कॉफी यांची व्यवस्था व्हेंडरकडून किंवा पॅंट्रीमार्फत होणार आहे. तसेच सामान आणि पार्सलही बुक करण्याची व्यवस्था या गाड्यांत करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.