Pune

पुण्यातील IAS अधिकाऱ्याला CBI ने रांगेहाथ पकडले; ८ लाखाची मागितली होती लाच

By PCB Author

June 09, 2023

पुणे, दि. ९ (पीसीबी)- पुण्यात महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. अनिल रामोड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने धाड टाकली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना 8 लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने पकडले. सीबीआयने या संदर्भात सापळा रचला होता. रामोड हे आयएएस अधिकारी असून महसूल विभागात ते उपयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर छापेमारी झाल्याने विभागीय आयुक्त कार्यलयात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रामोड यांनी हायवे लगत असलेल्या जागेचा परतावा लवकर मिळावा यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत सीबीआयने छापेमारी करत अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.