पुण्यातील ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा नव्या जागेत होण्याची शक्यता

0
452

पुणे दि. ८ (पीसीबी) – पुण्याच्या सांकृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा नव्या जागेत होण्याची शक्यता आहे. कारण, यंदा शनिवार पेठेतील रमणबाग शाळेच्या मैदानावर हा महोत्सव होणार नाही, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी  दिली आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यंदा ‘सवाई’साठी शाळेचे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे मंडळाला लेखी कळवले आहे. मात्र, महोत्सवासाठी नव्या जागेबाबत अद्याप निश्चिती झाली नसल्याचेही सांगितले जात आहे.

या संगीत महोत्सवाच्या काळातच शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान,    रमणबागच्या मैदानावरच महोत्सव घेण्याबाबत सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. त्यानंतर स्थळाबाबत निर्णय घे्ण्यात येईल, असे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.