पुण्यातील शनिवार पेठेतील इमारतीला भीषण आग

0
419

पुणे, दि. १६ (पीसीबी) – शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीतील गोदामाला आज (गुरुवार) सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. जोशी संकुल ही पाच मजली इमारत आहे. आग पहिल्या मजल्यावरील औषधाच्या गोदामाला लागल्याने वरील मजल्यावरील नागरिकांना धुराचा त्रास होऊ लागला. यामुळे काही नागरिक टेरेसवर जमा झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बीए सेटच्या सहाय्याने नागरिकांना इमारतीखाली उतरवले आणि अर्ध्या तासात आग विझवली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.