Pune

पुण्यातील मुठा कालवा बाधितांना धान्‍य वाटप

By PCB Author

September 30, 2018

पुणे, दि.३० (पीसीबी) – मुठा उजवा कालवा फुटून बाधित झालेल्‍या नागरिकांना आज (रविवार) मोफत धान्‍य वाटप करण्‍यात आले. अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवाग्रस्‍तांना शासनाच्‍यावतीने आवश्‍यक ती मदत करण्‍याचे जाहीर केले होते. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कालवाबाधितांच्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे आदेश दिले.

जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने ७२९ पंचनामे पूर्ण करण्‍यात आले. हे पंचनामे व कालवाबाधितांची यादी अन्‍न व धान्‍य वितरण अधिकारी कार्यालयाकडे प्राप्‍त होताच आपत्‍तीग्रस्‍तांना मोफत धान्‍य वाटप करण्‍यात आले. यावेळी अन्‍न धान्‍य वितरण अधिकरी अस्मिता मोरे, गीतांजली गरड-मुळीक, राजश्री भंडारी, वीरनक, माने आदी अधिकारी उपस्थित होते.