पुण्यातील मान्याच्या ५ गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन; रविवारी सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार

0
575

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पुण्यातील जगप्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवणुकीचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यामुळे देशविदेशातील हजारो नागरिक ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. परंतु, मागील काही वर्षांपासून ही मिरवणूक दीड दिवसांहून अधिक काळ चालत असल्यामुळे त्याचा पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यातील मानाच्या पाच मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत काढून कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संदेश दिला जाणार आहे. तसेच मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये केवळ १५ मिनिटांचे अंतर ठेवले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.