पुण्यातील मांत्रिकाकडे जावून येते असे सांगून महिला मुलीसह एक महिन्यापासून बेपत्ता

0
1487

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – मांत्रिकाकडे जावून येते असे सांगून एक विवाहित महिला तिच्या पाच वर्षांच्या मुलीसह शनिवार १५ डिसेंबर २०१८ पासून बेपत्ता झाली आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी जे ब्लॉक-४०९ येथून समोर आली.

निशा तेजबहादुर पौडवाल (वय २९) आणि तिची मुलगी निरा पौडवाल (वय ५) असे बेपत्ता माईलेकीचे नाव आहे. याप्रकरणी तेजबहादुर पौडवाल (वय ४८, रा. भोसरी एमआयडीसी जे ब्लॉक-४०९) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजबहादुर हा बेपत्ता महिलेचा पती आहे. त्यांची पत्नी निशा हि पाच वर्षांची मुलगी निरा हिला घेऊन पुण्याला एका मांत्रिकाकडे जाऊन येते असे सांगून गेली होती. एक दिवस उलटून गेला तरी ती घरी परतली नाही. यावर तेजबहादुर यांनी निशाला फोन केला. तेव्हा तिने ती पुण्यातील एका मैत्रीणीकडे असल्याचे तेजबहादुर यांना सांगितले. मात्र पुन्हा दोन दिवस उलटून गेले तरी सुध्दा निशा घरी परतली नाही. यावर तेजबहादुर यांनी पुन्हा निशाला फोन केला यावेळी तिचा फोन बंद होता. त्यांनी शनिवार १५ डिसेंबर रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. मात्र एक महिना उलटून गेला तरी अद्याप त्यांचा काही पत्ता लागला नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.