Pune

पुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार

By PCB Author

August 20, 2018

पुणे, दि. २० (पीसीबी) –  अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून ‘तीन वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तेव्हा अंदूरे हा धीरज घाटे बरोबर तिथे उपस्थित होता’असे सांगितले आहे.

मात्र याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांनी आक्षेप घेत सचिन अंदुरे याच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून नाहक बदनामी केल्याप्रकरणी आव्हाड यांचे विरोधात सायबर क्रार्इम सेल आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.