पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेला दोन लाखाच्या नुकसान भरपाईचे आदेश

0
1224

पुणे, दि. १ (पीसीबी) – पुणे ग्राहक न्यायालयाने पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रोड वरील शाखेला तब्बल दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शाखेच्या मुख्य अधिकारी यांना याबाबतचे पत्र ग्राहक न्यायालयाकडून पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी राम मारूती भिसे (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी ग्राहक न्यायालयात २०१७ साली बँकेविरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील रहिवासी असलेले भिसे हे पुणे महापालिकेत काम करतात. जून २०१६ ते नोव्हेंम्बर २०१६ या कालावधीत बँकेने भिसे यांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढू दिली नाही. भिसे हे पालिकेत कामाला असल्याने  त्यांचा महिन्याचा महिन्याला पगार खात्यावर जमा होत होता. जून ते नोव्हेम्बर या सहा महिन्याच्या कालावधीत त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. पैसे काढण्याबाबत बँकेला वारंवार विचारले असता त्यांनी क्षुल्लक कारणे सांगून या सहा महिन्याच्या कालावधीत खात्यावरील रक्कम भिसे यांना काढू दिली नाही.

तक्रारदार भिसे यांनी ग्राहक न्यायालयाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात जून २०१६ ते नोव्हेंबर या कालावधीत बँक स्टेसमेंटची प्रत जोडली आहे. या देखील त्यांनी कोणतीही रक्कम पुणे महापालिकेच्या कर्मचारी भिसे यांनी खात्यावरून काढलेली नाही, असे सिध्द होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँकेने या कालावधीथ भिसे यांना पैसे काढू दिले नाहीत ही बाब देखील स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने महाराष्ट्र बँकेला २ लाख रुपये नुकसान भरुपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस तपास करत आहेत.