Pune

पुण्यातील फेमस अशा एसपीज बिर्याणीमध्ये आढळली अळी

By PCB Author

June 02, 2019

पुणे, दि. २ (पीसीबी) – पुण्यातील सदाशिव पेठेतील नामांकित एसपीज बिर्याणी हाऊसच्या जेवणात अळी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारच्या सुमारास समोर आली. तर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठेत एसपीज बिर्याणी हाऊस मध्ये  विरेंद्रसिंग ठाकूर हे त्यांच्या मुलांसोबत जेवणासाठी गेले होते. जेवत असताना त्यांच्या मुलाच्या जेवणात अळी आढळून आली. याबाबत त्यांनी हॉटेल प्रशासनाला जाब विचारला. त्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत दमदाटी केली. तसेच जे काही करायचे ते करा असेही ठाकूर यांना सांगण्यात आले. ठाकूर यांनी आपल्या मोबाईलवर अळी सापडल्याचे चित्रिकरण करत होते. त्यावर हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांकडे किंवा कोणाकडे जायचे तिकडे जा असेही तो ठाकूर यांना म्हणाला. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाकडून अद्याप कसलेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.