पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांचा विरोध असताना केली सत्यनारायणाची महापूजा

0
862

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घातल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला असून सत्यनारायणाच्या महापूजेला लोकतांत्रिक जनता दल संघटनेने आक्षेप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयाचे मुख्य कार्यालय असणाऱ्या इमारतीमध्ये सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या मंदिरापुढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे इथे बोर्ड लावण्यात आला असून, सर्वांनी पूजेच्या तिर्थप्रासादाचा लाभ घ्यावा, असे लिहिण्यात आले आहे. देश-विदेशातील सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. मात्र, फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने कॉलेज प्रशासन धार्मिक रुढीचे उदात्तीकरण करत आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.