पुण्यातील पीडब्लूडीचा शाखा अभियंता लाच घेताना जाळ्यात

0
543

पुणे, दि. ०४ (पीसीबी) – पुण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंत्याला तब्बल अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले आहे. आज गुरुवारी (दि.०४) रोजी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

विलास तांभाळे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. बंडगार्डन परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी विशाल तांभाळे हे शाखा अभियंता आहेत. त्यांनी लाचेची मागणी केल्यानंतर याबाबत संबंधीतांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे. यामध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अभियंत्याला अडीच लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

अद्याप ही कारवाई सुरु असून अभियंत्याची चौकशी सुरु आहे. मात्र यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान राज्यात कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे असलेले लॉकडाऊन उघडताच लाचखोरी सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे.