पुण्यातील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात; १०० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक

0
697

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पाटील इस्टेट झोपडपट्टीला आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे तेथील घरातील पाच ते सहा सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग आणखीचा भडकून परिसरातील तब्बल १०० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत दोन जण जखमी झाले आहेत.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे तब्बल ४० बंब लागले यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील बंबांचा समावेश आहे. मात्र सायंकाळ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.  दाटीवाटीच्या या वस्तीत बंब जाऊन शकत नव्हते. यामुळे आग विझवण्यात विलंभ झाला. या आगीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घरे जळालेल्या नागरिकांची सोय स्थानिक ठिकाणीच करण्यात आली आहे.