पुण्यातील दत्तवाडी पोलीस चौकी परिसरातून भाजप नगरसेवकाची महागडी कार चोरट्यांनी पळवली

0
415

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुण्यातील दत्तवाडी पोलीस चौकीजवळून चक्क एका सत्ताधारी भाजप नगरसेवकाचीच कार चोरील्या गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहर परिसरात चर्चांना उधान आले असून, शहरात नगरसेवकच सुरक्षीत नसेल तर सामान्य माणसांच काय असा प्रश्न विचारला जात आहे.