Pune

पुण्यातील ऑल इंडीया शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचा A+ दर्जा

By PCB Author

October 02, 2018

पुणे, दि. २ (पीसीबी) – ‘राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद ‘(नॅक) बंगळुरू यांच्या वतीने पुण्यातील ऑल इंडीया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला A + हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. A+ हा दर्जा मिळविणारे महाराष्ट्रातील हे एकमेव महाविद्यालय आहे. नॅक मूल्यांकनाच्या नव्या पद्धतीनुसार पहिल्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे.

यावेळी संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या महाविद्यालयाची  शैक्षणिक गुणवत्ता कायमच वरच्या श्रेणीची राहिलेली आहे. आजपर्यंत महाविद्यालयाचे ६३५ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले. शिवाय, महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना (Alumni Association) अतिशय सक्रीयपणे कार्यरत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुवर्ती अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था हा लौकिक या संस्थेने प्राप्त केलेला आहे.