पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ एर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
478

पुणे, दि.२० (पीसीबी) –  पुणे-सोलापूर रोडवरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ९ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी सर्व विद्यार्थी यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी परतताना हा अपघात झाला असल्याचं समजतंय.

भीषण अपघातात मृत पावलेले विद्यार्थी यवतमधील रहिवासी असून सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

दरम्यान, या घटनेचा लोणी काळभोर पोलीस तपास करत आहेत.