पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट आले

0
465

पुणे, दि.५ (पीसीबी) : पुण्यात कोरोनाने अक्षरशा थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात झपाट्यानेवाढ होत आहे. काल पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खुद्द महापौरांनीच दिली. आता मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान महापौरांच्या कुटुंबातील इतर काही सदस्यांचे कोरोना रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. महापौर मोहोळ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल ट्विटद्वारे दिली होती. “ थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारा दरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील’. असे मोहोळ यांनी ट्विट मध्ये म्हंटले होते. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोहोळ उपस्थित होते. या बैठकीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापालिका आयुक्त आणि इतर अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या सर्वांची काळजी वाढली आहे.