पुण्याच्या दिशेने येणारी मोटार नाल्यात पडून चालकाचा मृत्यू; भोसरील पाच जण गंभीर जखमी

0
432

पेण, दि. २२ (पीसीबी) – भोसरीतील तरूणांची मोटार अलिबागवरून पुण्याच्या दिशेने येत असताना मद्यधुंद चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार नाल्यात पडून अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोसरीतील पाच तरूण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. २१) रात्री पावणे अकराच्या सुमारास पेणजवळील आंबेगाव येथे झाला.