Pune

पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का?; शरद पवारांनी काय दिले उत्तर  

By PCB Author

November 11, 2018

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान उजाळा दिला. या मुलाखतीत आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का?, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर आता निवडणूक नाही, असे सांगत पुण्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पवार यांनी पूर्णविराम दिला.  

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला ५२ वर्षे पूर्ण होत आहे.   पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे, असे पवार यांनी सांगितले.