Pune

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

By PCB Author

August 04, 2020

पुणे,दि.४(पीसीबी) – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. पण, एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.